जळगाव ( प्रतिनिधी ) — सावन कृपाल रुहानी मिशनचे अध्यक्ष संत राजिंदरसिंह महाराजांच्या हीरक जयंतीचा अध्यात्म, प्रेम आणि असीम कृपेच्या वर्षावाचा उत्सव 20 सप्टेंबररोजी साजरा केला गेला.
अध्यात्मिक गुरु तसेच ध्यानाभ्यास विषयावर आधारित पुस्तकांचे लेखक संत राजिदंरसिंह महाराज म्हणतात की, आपण आपल्या वास्तविक रूपाला म्हणजेच आत्मिक रूपास जाणावे आणि अंतरी प्रभूशी जोडले जावे. तीन दिवसीय ऑनलाइन कार्यक्रमास विश्वभरातील लाखो लोक पाहात होते.
संत राजिदंर सिंह महाराजांनी ” अंतरी जागृत रहा, संपर्कात रहा आणि काळजी घ्या” असा संदेश दिला. ध्यान-अभ्यासाद्वारे आपण स्वतःला आत्मिक स्वरूपात अनुभवतो, जो चेतन आहे आणि प्रभूचा अंश आहे. आपण याची अनुभूती घेतो की आपण आत्मा आहोत, तेव्हा इच्छा होते की आपण प्रभुचे प्रेम आणि प्रकाशाशी जोडले जावे. आपण प्रभूशी जोडले जातो, त्यानंतर प्रभु केवळ माझ्यातच नव्हे तर बाकी सर्व जीवांमध्ये सुद्धा आहे याची जाणीव होते. आपण प्रेमपूर्वक प्रत्येकाची काळजी घ्यावयास लागतो. संत राजिंदरसिंह महाराजांनी हा संदेश अमेरिकेतून दिला. अमेरिकेहून युट्युबवर दिला.
संत राजिंदरसिंह महाराज विज्ञान आणि त्याच्या निष्कर्षांच्या उदाहरणातून अध्यात्मिक शिकवणूक समजावितात. म्हणून विश्व आज याचा स्वीकार करत आहे की, कशाप्रकारे विज्ञान आणि अध्यात्म एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.
संत राजिंदरसिंह महाराजांचे जीवन आणि कार्य हे प्रेम आणि निष्काम सेवेची निरंतर चालणारी यात्रा आहे. ती जगभरातील लाखो लोकांच्या जीवनातील खऱ्या उद्देशाला प्राप्त करण्यास मदत करते. ते लोकांना ध्यानाभ्यासाची विधी शिकवून परमेश्वराची अनुभूती करवितात. त्यांचा संदेश विश्वभरातील लोकांमध्ये आशा, प्रेम, एकता आणि निष्कामसेवेच्याप्रति जागृती निर्माण करतो. त्यांना विविध देशांद्वारे 5 डॉक्टरेट पदव्या देऊन सन्मानित करण्यात आलेले आहे.
सावन कृपाल रूहानी मिशनची विश्वभरात 3,200 पेक्षा अधिक केंद्र स्थापित आहेत. मिशनचे साहित्य विश्वभरातील 55 पेक्षा अधिक भाषांमध्ये प्रकाशित झालेले आहे.







