जळगाव ( प्रतिनिधी ) — शहराजवळील चिंचोली गावात आज ५०० लोकांचे कोरोना लसीकरण करण्यात आले
आज चिंचोली येथे सरपंच शरद घुगे यांच्या प्रयत्नांनी व डॉ चेतन अग्निहोत्री यांच्या मार्गदर्शनाखाली व चिंचोलीतील सर्व आरोग्यसेवक , आरोग्यसेविका, आशासेविका यांच्या सर्वांच्या नियोजनानुसार चिंचोलीत 500 डोस कोविशिल्डचे लसीकरण पार पडले येथील सरपंच शरद घुगे, उपसरपंच पिंटू धुमाळ, माजी उपसरपंच किरण घुगे, ग्रा पं सदस्य आनंद घुगे , सुनील लाड , मनोज घुगे , सागर घुगे , विजय लाड , प्रतीक घुगे , गोपाल पाटील तसेच चिंचोली येथील ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.







