जळगाव ( प्रतिनिधी ) — कुसुंबा शिवारातील शेतातून बोबडे बुवा महाराज समाधीच्या मंदिरातील दगडी शिळेवर लावलेली ३० हजारांची तांब्याची छत्री अज्ञात चोरट्याने चोरून नेली एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
कुसुंबा शिवारात यशवंत पाटील यांच्या शेतात बोबडे महाराज यांची समाधी आहे. या समाधीच्या ठिकाणी गावकऱ्यांनी मंदिरातील दगडी शिळेवर तांब्याची छत्री व दोन घंटा बसवलेल्या होत्या. २२ सप्टेंबररोजी वसंत पाटील आणि त्यांचे पुतणे गजानन पाटील हे सायंकाळी मंदिरात जाऊन पूजा करून निघून आले. अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री समाधीवरील ३० हजार रुपये किमतीची ६ किलो वजनाची तांब्याची छत्री चोरून नेल्याचे २३ सप्टेंबररोजी सकाळी उघडकीला आले देवलाल पाटील, पंडित पाटील आणि सुनील पाटील हे सकाळी मंदिरात पूजा करण्यासाठी गेले असता हा प्रकार उघडकीला आला. वसंत पाटील यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.







