जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील बीएसएनएल कार्यालयाच्या समोरील खाजगी हॉस्पीटल मध्ये असिस्टंट डॉक्टर म्हणून कामाला असणारे डॉ. कुणाल नारखेडे हे काल दुपारी बेपत्ता झाले होते. रात्री ३ वाजता ते घरी परतले यामुळे त्यांच्या घरच्या मंडळीनी सुटकेचा श्र्वास घेतला.
याबाबत माहिती असी जळगाव शहरातील डॉ. कुणाल नारखेडे हे बीएसएनएल कार्यालयाच्या समोर एका खाजगी हॉस्पीटल मध्ये असिस्टंट डॉक्टर म्हणून कामाला आहे. त्याच्या पत्नी शहरातील शाहुनगर हाँस्पिटल येथे डॉक्टर आहे. काल दुपारी १२ वाजेच्या सुमारास डॉ.कुणाल नारखेडे वीस मिनीटात परत येतो असे रिसेप्शन काऊंटर वर सागुन आपला मोबाईल तिथे देऊन बाहेर पायी चालत गेले होते. त्याची फोरव्हीलर गाडीपण घेऊन नाही गेले. वडील व पत्नी डॉक्टर यांनी त्याचा मित्रमंडळी सह नातेवाईकांनकडे शोधाशोध केला. परतु ते मिळून न आल्याने रात्री १० वाजता त्याच्या वडिलांनी डॉ कुणाल नारखेडे हे हरविल्याची नोद जिल्हापेठ पोलीस स्टेशनमध्ये केली. रात्री ३ वाजता ते घरी सुखरूप पोहोचले असे त्यांच्या मित्र मंडळी कडून आज सकाळी कळाले. डॉ कुणाल नारखेडे कुठे गेले होते. हे मात्र अध्याप कळाले नाही आहे.