जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील बीएसएनएल कार्यालयाच्या समोर एका खाजगी हॉस्पीटल मध्ये डॉ. कुणाल नारखेडे कामाले होते. वीस मिनीटात परत येतो असे रिसेप्शन आपला मोबाईल देऊन बाहेर गेले.पण अद्याप पर्यंत डॉ.नारखेडे परत आलेच नाही. याप्रकरणी जळगाव जिल्हापेठ पोलीसात हरविल्याची नोद करण्यात आली आहे.
याबाबत माहिती असी जळगाव शहरातील डॉ. कुणाल नारखेडे हे बीएसएनएल कार्यालयाच्या समोर एका खाजगी हॉस्पीटल मध्ये असिस्टंट डॉक्टर म्हणून कामाला आहे. त्याच्या पत्नी जळगाव शाहुनगर येथे डॉक्टर आहे. आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास डॉ.कुणाल नारखेडे वीस मिनीटात परत येतो असे रिसेप्शन सागुन आपला मोबाईल देऊन बाहेर गेले.पण अद्याप पर्यंत ते घरी कीवा नातेवाईकांनकडे पण नसल्याने पत्नी व वडिलांनी त्याचा शोधाशोध केला. मात्र ते १० वाजेपर्यंत आले नसल्याने जळगाव शहरातील जिल्हा पेठ पोलीसात हरविल्याची नोद दाखल करण्यात आली आहे. डॉ.नारखेडे परत आलेच नाही.
पुढील तपास स.पो.नि. किशोर पवार हे करीत आहे.