जळगाव (प्रतिनिधी) – तालुक्यातील नशिराबाद येथील उड्डाणपुलाजवळ गोळीबारात झाल्याची घटना मंगळवारी २१ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ६:४५ वाजेच्या सुमारास घडली. असल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेत प्राथमिक माहितीतुन, एक ठार तर एक जण जखमी झाल्याचे दिसून येत आहे. जखमीला डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय दाखल करण्यात आले असून मयताला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात जळगाव येथे आणण्यात येत आहे.
भुसावळ येथील खुनाच्या खटल्यामधील सुरळकर बंधू असलेल्या दोन संशयित आरोपींना मंगळवारी जामीन मिळाला होता. जामीन मिळाल्यानंतर उर्वरित प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर ते भुसावळला दुचाकीने परतत असतांना त्यांना अज्ञात मारेकर्यांनी रोखले. त्याच वेळी त्यांच्यावर अज्ञात मारेकऱ्यांनी चोपरनें आणि बंदुकीने हल्ला चढवत त्यांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहे. घटनास्थळी पोलीसांचा फोज फाटा पोहोचला आहे. मारेकऱ्यांचा तपास पोलीस करीत आहे.