भडगाव (प्रतिनिधी ) तालुक्यातील कजगाव येथून जवळच असलेल्या गोंड़गाव येथील इसमाचा गोंडगाव ते लोन रस्त्यावर गाडी उलटूत अपघातात जागीच मृत्यू झाल्याची घटना आज घडली
मुस्ताक बशीर मनियार (वय ३१) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या इसमाचे नाव आहे तो टाटा मालवाहु गाडी ( क्रमांक– एम एच 20 सी टी 8603 ) ने कजगावकडे येत असतांना अचानक गाडी पलटी झाल्याने त्यांचा जागेवरच मुत्यु झाला
या रस्त्यावर मोठे खड्डे असल्याने येथे अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमानावर वाढले आहे नेहमी होणाऱ्या अपघाताची मालिका आज एका व्यक्तीच्या जीवावरच बेतली घरातील कमावता पुरूष अपघातात गमावल्याने मयताचा परिवार घटनास्थळी शोकविव्हळ झाला होता, त्याच्या पश्चात पत्नी, आई – वडील , मुलगी , भाऊ असा परीवार आहे