जळगाव ( प्रतिनिधी ) — शहरासह जिल्ह्यात कुठेही कर्करुग्णाबद्दल माहिती मिळाल्यावर स्वखर्चाने त्याच्या घरी जाऊन त्या रुग्णांसह त्याच्या कुटुंबीयांनीही उमेद जागवणारी भरारी देणाऱ्या श्वेता शर्मा या अवलिया व्यक्तिमत्त्वाबद्दल आज जळगावकर अभिमानाने फुलून जावेत अशी त्यांची संघर्षगाथा आहे.

शिक्षणानंतर श्वेता शर्मा यांनी व्यवसायाची वाट जवळ केली टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या व्यवसायात पुढे त्या रमल्या , यशस्वीही झाल्या . त्यांची टूर्स अँड इव्हेंट कंपनी पार्टनरशिप फर्म त्यांनी नावारूपाला आणली आहे. भारत भरातील आणि जगभरातील विमानांची तिकिटे मिळवून देणे , हॉटेल- टॅक्सी बुकिंग , व्हिसा व पासपोर्ट मिळवून देणे , गोवा, हिमाचल प्रदेश , महाराष्ट्र , काश्मीर , लडाख , उत्तराखंड या राज्यांसह बँकॉक , दुबई , मालदीव, नेपाळ आणि भुतांसाठी टूर्स पॅकेजेस , समूह , दाम्पत्य , कुटुंब आणि व्यावसायिकांसाठी देशांतर्गत आणि आतरराष्ट्रीय टूर्स पॅकेजेस , व्यावसायिक बैठका व समारंभ , लग्न सोहळे , वाढदिवसाचे सोहळे साजरे करण्यासाठीच्या व्यवस्थेची जबाबदारी ; अशा सेवा त्यांची ही संस्था पुरवते . जिल्ह्यात या क्षेत्रात यशस्वी झालेल्या निवडक व्यवसायिकांपैकी त्या आहेत.
टूर्स अँड इव्हेंट कंपनीसोबतच त्या शुभमंगल शादी ब्यूरोच्याही संचालिका आहेत . समाज विधवा पुनर्वसन, समाजाने टाकून घेतलेल्या, वय निघुन गेलेल्या आणि इतर संकटात सापडलेल्या मुलींचे व मुलांचे लग्न इच्छा असली तरी पुन्हा विवाहेच्छु वर वधु यांना पठिबा देत नाही आणि मदतच करत नाही तर त्यासाठी सर्व प्रयत्न करतो आम्ही करतो , असे त्या आवर्जून सांगतात.
या हरहुन्नरी व्यक्तिमत्वाला अन्न नलिकेच्या कर्करोगाने गाठल्यावरही त्या हतबल झाल्या नाहीत . जणू नियतीशी संघर्षाचा उभा दावा मांडणाऱ्या विजिगिषु वृत्तीने त्या या आजाराशी झगडत आहेत प्रचंड सकारात्मकतेचा जोरावर त्यांनी हा आजारपणाचा त्रास पण कह्यात ठेवला आहे उपचारांनी बरे वाटू लागताच त्या उपचाराच्या काळात आलेल्या अनुभवांमुळे आणि मिळालेल्या माहितीमुळे इतरांनाही पुढाकार घेऊन उमेद देत आहेत . कर्करुग्णाबद्दल माहिती मिळाल्यावर स्वखर्चाने त्याच्या घरी जाऊन त्या रुग्णांसह त्याच्या कुटुंबीयांनीही उमेद जागवणारी भरारी देत आहेत .







