चाळीसगाव ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील वाघडू येथील स्मशानभूमीच्या भिंतीवरील लोखंडी अँगल तोडून साडे सतरा हजारांचा मुद्देमाल चोरी करणाऱ्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाघडू येथे स्मशानभूमीच्या भिंतीवरील लोखंडी अँगल तारेच्या कुंपणाचे काम सन २००९-१० साली ग्रामपंचायतीच्या निधीतून करण्यात आले. रविवारी सकाळी स्मशानभूमीतील लोखंडी अँगल तोडून भंगारवाल्याला विकल्याची बाब उघडकीला आली. ग्रामसेवक सुनिल पवार व ग्रामपंचायत सदस्य राहूल पाटील यांना गावात भंगार विक्रेत्याकडे ते लोखंडी अँगल दिसून आले.
भंगार विक्रेत्याने मी भिल्ल वस्तीतून अँगल घेतले असल्याचे सांगितले. आमने सामने ओळख पटवल्यावर त्याने छगन गायकवाड, सोमनाथ गायकवाड, अर्जून गायकवाड व जगन गायकवाड यांच्याकडून विकत घेतल्याचे सांगितले. १७ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल चोरून परस्पर विक्री केल्याप्रकरणी ग्रामसेवक सुनिल पवार यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलिस स्थानकात या चौघांसह भंगार विक्रेत्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला .







