जळगाव (प्रतिनिधी ) — प्रांताधिकारी यांच्या आदेशान्वये गणेशोत्सवात हद्दपार केलेला विशाल अहिरे या आरोपीला शनीवारी रात्री १० वाजता एमआयडीसी पोलिसांनी रामेश्वर कॉलनी येथील राहत्या घरातून अटक केली एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील हद्दपार असलेला आरोपी विशाल राजू अहिरे (रा. आदित्य चौक, रामेश्वर कॉलनी) जळगाव या गुन्हेगाराला गणेशोत्सवात पोलिसांनी हद्दपार केले होते. आरोपी विशाल आहिरे शनिवारी रामेश्वर कॉलोनीत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांना मिळाली, त्यानुसार त्यांच्या पथकातील सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, पो कॉ सचिन पाटील, सतीश गर्जे, साईनाथ मुंडे यांनी कारवाई करत शनिवारी रात्री हद्दपार आरोपी विशाल अहिरे चौक अटक केली. पो कॉ गोविंदा पाटील यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.







