पाचोरा ( प्रतिनिधी ) – शहर राष्ट्रवादी काँग्रेस आणि माजी आमदार दिलीपवाघ यांच्या मार्गदर्शनाने पाचोरा शहरातील महालपुरे मंगल कार्यालयात कोरोना लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
प्रभाग क्रमांक ९ मधील गाडगेबाबा नगर, भास्कर नगर, ओं.ना.वाघ नगर, तक्षशिला नगर, कालिका नगर, एमआयडीसी कॉलनी, दामजी नगर, व्हीआयपी कॉलनी, पुजारी नगर, सद्गुरू नगर, शाहूनगर, गोविंद नगरी, लक्ष्मी आंगन, लक्ष्मी पार्क, भाग्य लक्ष्मी कॉलनी, तलाठी कॉलनी येथील नागरिकांसाठी हे शिबीर आयोजित करण्यात आले होते.
सकाळी नऊ वाजेपासून शिबिर सुरू झाल्यावर नागरिकांनी लस घेण्यासाठी गर्दी केली होती. राष्ट्रवादीचे गटनेते संजय वाघ यांचेसह प्रकाश भोसले, सतीश चौधरी, आकाश वाघ, सरला पाटील, रेखा देवरे, संजय सूर्यवंशी, मनिष बाविस्कर, राजेंद्र ठाकरे, संजय पाटील, राजेंद्र पाटील , उमेश एरंडे, निलेश पाटील, दीपक ब्राह्मणे, हेमंत पाटील, गौरव शिरसाट, धर्मेश मोरे, तुषार राजपूत, दर्शन शिरसाठ, चेतन पाटील, गणेश पाटील, सुरेश जाधव, भावेश चव्हाण, संदीप सोनवणे, पियुष करंदे, पुष्पक पाटील, सागर भोसले, मुकेश बाविस्कर, भूषण राजपूत, प्रशांत पाटील, सतीश देशमुख यांनी शिबिर यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले.