जालना ( प्रतिनिधी ) – जिल्ह्यातील अंबड येथून देवदर्शन करुन गावाकडे परत जात असताना शहापुरजवळ अज्ञात वाहनांनी दुचाकीला धडक दिल्याने 25 वर्षीय महिला जागीच ठार झाली आणि बापलेक या अपघातात जखमी झाले आहेत. हा अपघात काल दुपारी घडला.

गेवराई तालुक्यातील किनगाव येथील पांडुरंग चाळक (31) व पत्नी स्वाती चाळक (25) हे त्यांच्या मुलाला घेऊन अंबड येथे देवदर्शनाला गेले होते. देवदर्शन करून त्यांच्या स्प्लेंडर बाईकवरून ते किनगावी परत जात असताना जालना- वडीगोद्री राष्ट्रीय महामार्गावरील शहापूरजवळ अज्ञात वाहनाने त्यांना जोरात धडक दिली. स्वाती चाळक यांना जबर मार लागल्याने त्या जागीच मुत्युमुखी पडल्या पांडुरंग व त्यांच्या मुलगा दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना अंबड येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे.







