जळगाव ( प्रतिनिधी ) – शहर व जिल्ह्यात गणपती विसर्जन 19 सप्टेबररोजी आहे. या दिवशी कोरोनाच्या पार्श्वभुमीवर कोणत्याही गणेश मंडळांना मिरवणूका काढता येणार नाही. जिल्हा प्रशासनाकडून तसे जाहीर करण्यात आले आहे.

विसर्जन मिरवणूक काढल्यास संबंधितांवर सक्त कायदेशीर कारवाई करण्यात येईल. गणेश भक्तांनी विसर्जन प्रक्रीया सकाळी लवकर सुरु करण्याचे देखील आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे. घरगुती गणेश भक्तांनी गणेशमुर्ती नजीकच्या म.न.पा. संकलन केंद्र अथवा स्वयंसेवी संघटनांकडे जमा करायच्या आहेत. घरगुती गणेश भक्तांना जळगाव शहरातील डी मार्ट चौकाच्या पुढे मेहरुण तलावाच्या दिशेने जाता येणार नाही.
जळगाव शहरातून पाचोरा शहराकडे अथवा पाचोरा शहराकडून जळगावकडे येणा-या व जाणा-या वाहन चालकांनी (जड वाहने वगळता) आकाशवाणी चौक, काव्यरत्नावली चौक, महाबळ, संत गाडगेबाबा चौक, मोहाडी रस्त्याचा वापर करायचा आहे.







