जळगाव ( प्रतिनिधी ) – लिफ्ट देऊन बसवलेल्या सहप्रवाशानेच चालकाचे पैसे चोरल्याची घटना काळ शहरातील आकाशवाणी चौकात उघडकीस आली. पोलिसांनी ही रक्कम चालकाला परत मिळवून दिली.
फिर्यादी कार चालक रमेश यादव ( रा – मोहन नगर , वापी , जि – वलसाड ) यांनी त्यांच्या फिर्यादीत म्हटले आहे की , ते त्यांच्या मालकाच्या कारने ( जी जे – १६ — ए – ४५१९ ) वापीहून नागपूरला त्यांच्या मालकाच्या नातेवाईकांना आणायला जात होते धुळे येथे एका व्यक्तीने सकाळी ७ वाजता त्यांना भुसावळ पर्यंत सोडावे म्हणून लिफ्ट मागितली होती. त्याला गाडीत बसवल्यावर सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास जळगावच्या आकाशवाणी चौकात चालकाला सीटबेल्ट नसल्याने पोलिसांनी कार थांबवली होती. चालकाला पोलिसांनी आकारलेला दंड भरण्यासाठी त्यांनी ड्रॉवरमध्ये ठेवलेले पैसे शॊधले तेंव्हा ते चोरीला गेल्याचे या चालकाच्या लक्षात आले त्यांनी सहप्रवाशावर संशय व्यक्त करून पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी दोघांना वाहनासह जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात नेल्यावर या आरोपी सहप्रवाशाने चोरीची कबुली दिली. त्यानंतर आरोपी मोहम्मद इस्माईल नेहाल अहमद यांच्याविरोधात गु र न ४१५ / २१ भा द वि कलम ३७९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.