जळगाव ( प्रतिनिधी ) – नागवेल प्रतिष्ठान (जळगांव) व खान्देश बारी समाज आयोजित ११ वा राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
राज्यस्तरीय बारी समाजाचा उपवर वधू-वर परिचय मेळावा शासनाकडून वेळोवेळी प्राप्त होणाऱ्या मार्गदर्शक सुचनेनुसार होणार आहे. या मेळाव्याच्या निमित्ताने बारी समाज उपवर वधू-वर सूची-२०२१ मान्यवरांचे हस्ते प्रकाशित करण्यात येणार आहे. इच्छुकांनी आपले फॉर्म मयुरेश टाईम्स् , आनंदा बारी (तेली चौक विठ्ठल पेठ जुने जळगांव), विजय बारी (बालाजी फोटो, अतुल डेअरी प्रिंप्राळा), भुषण बारी ( ह.वि नगर )व समस्त बारी पंच मंडळ अथवा युवक मंडळांकडे ३१ ऑक्टोबर पर्यंतच जमा करावे. असे आवाहन अध्यक्ष प्रा.नितिन बारी, लतिश बारी, अतुल बारी, भरत बारी, विनोद लावणे, योगेश बारी, नितिन बारी, सुशिल बारी, कमलेश बारी यांनी केले आहे.