वरणगाव फॅक्टरी ( प्रतिनिधी ) — वरणगाव फॅक्टरीतील 32 वर्षीय कर्मचार्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
गुरुवारी सायंकाळी ही घटना घडली. संदीप प्रकाश सपकाळे (32) असे मयताचे नाव आहे. वरणगाव फॅक्टरीतील बिल ग्रुप विभागात लिपीक पदावर कार्यरत संदीप प्रकाश सपकाळे हे वरणगाव आयुध निर्माणी वसाहतीतील क्वार्टर क्रमांक 195 मॉडिफाइड येथे वास्तव्यास होते. त्यांनी पंख्याला सुताची दोरी बांधुन गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही. सहाय्यक .पोलीस निरीक्षक आशिषकुमार अडसुळ, पो हे कॉ मुकेश जाधव, प्रभारी होमगार्ड अधिकारी संजय चौधरी आदींनी घटनास्थळी धाव घेतली. मयताच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली, मुलगा असा परीवार आहे. जळगाव येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.