चाळीसगाव ( प्रतिनिधी ) — पातोंडा येथील विवाहितेचा भूखंड खरेदीसाठी माहेरहून एक लाख रुपये आणावे म्हणून पतीसह सासू आणि दीर यांनी छळ केल्याने चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुक्ता सुनील कुंभार (वय-२८ , रा.गणेशपुर ह.मु. पातोंडा , ता – चाळीसगाव ) यांचा विवाह ९ मे २०१७ रोजी सुनील जगदाळे (रा. गणेशपुर ) यांच्याशी झाला. सुरुवातीचे काही दिवस बरे गेल्यानंतर पती सुनील जगदाळे यांनी बांधकाम व्यवसाय व प्लॉट विकत घेण्यासाठी माहेरहून १ लाख रुपये आणावेत यासाठी मारहाण करून शिवीगाळ केली. सासू आणि दीर यांनी देखील याला प्रोत्साहन दिले. हा त्रास सहन न झाल्याने विवाहिता माहेरी पातोंडा येथे निघून आल्या. त्यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात पतीसह सासू शकुंतला जगदाळे आणि दीर अनिल जगदाळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पो ना प्रविण संगिले करीत आहेत.








