अमरावती ( प्रतिनिधी ) – चित्रपट दिग्दर्शक सागर भोगे यांना आर्ट बिटस् युवा कला गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.
” युवा कला गौरव ” कला विभागात हा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला असून, आर्ट बिटस् फौंडेशनकडून हा पुरस्कार ऑनलाईन पध्दतीने प्रदान करण्यात येणार आहे. चित्रपट क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
या पुरस्काराची माहिती देतांना आर्ट बिटस् पुणे या संस्थेचे संस्थापक संचालक संतोष पांचाळ म्हणाले की आर्ट बिटस् ही संस्था गेली वीस वर्षे सातत्याने चित्र, शिल्प, संगीत, अभिनय, नृत्य आणि लोककला या विभागातील कला आणि कलाकारांना सक्षम व्यासपीठ व प्रोत्साहन देण्यासाठी काम करीत आहे.