जळगाव ( प्रतिनिधी ) — महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र असलेल्या गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाची स्थापना जळगावात करण्यात आली आहे . या संघटनेला नुकताच राज्य सरकारकडून श्रमिक संघ अधिनियम १९२६ नुसार एनएसके / जे / २२०१ हा नोंदणी क्रमांक मिळाला आहे
गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष नरेंद्र कदम ( जळगाव ) यांनी दिलेल्या माहितीनुसार या संघटनेच्या मुख्य कार्यकारिणीत राज्य उपाध्यक्ष म्हणून रवींद्र पवार ( रावेर ) , राज्य महासचिव पदावर भगवान सोनार ( जळगाव ) , खजिनदार म्हणून ललितकुमार खरे ( जळगाव ) आणि कार्यकारिणी सदस्य म्हणून गणेश पाटील ( मोताळा ) , सुनील चौधरी ( धुळे ) , सौ जोशीला पगारिया ( साक्री , धुळे ) , शालिकराम पवार ( जळगाव ) , विकास अशोक पाटील ( जळगाव ) यांच्या नियुक्त्या सर्वसंमतीने करण्यात आल्या आहेत
राज्यातील सर्व वृत्तपत्रे आणि दूरचित्रवाणी वाहिन्यांचे संपादक , वार्ताहर , पत्रकार , मुक्त पत्रकार , प्रतिनिधी , छायाचित्रकार आणि पत्रकारितेच्या क्षेत्रात अन्य कामे करणारे कुणीही या संघटनेचा सभासद होऊ शकतो . प्रदीर्घ काळापासून पत्रकारितेत असल्याने पत्रकारांच्या समस्या , आव्हाने , स्थैर्यासाठी घ्याव्या लागणाऱ्या भूमिकेची जाणीव या कार्यकारिणीतील सर्वच पदाधिकाऱ्यांना आहे पत्रकारितेतील सर्वांचे जीवनमान उंचावणे , आजारपणासह म्हातारपणात आवश्यक सुविधांची सहज उपलब्धता वाढविण्यासाठी सरकारसह समाजातील विविध घटकांच्या मदतीने प्रयत्न करणे , अपघातांच्या घटनांमध्ये भरपाई मिळवून देणे , राजकारण आणि प्रशासनातील अपप्रवृत्तीपासून सभासदांना संरक्षण मिळवून देणे , रोजगारासाठीच्या अडचणींमध्ये सदस्यांना आधार देणे , समविचारी संघटनांशी समन्वय ठेऊन समान ध्येयासाठी काम करणे , उद्दिष्टपूर्तीसाठी भारतासह भारताबाहेरील संघटनांना मदत करणे आणि त्यांची मदत मिळवणे , सदस्यांची फसवणूक किंवा पिळवणूक होत असेल तर त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी दोषींवर कायदेशीर कारवाईच्या प्रक्रियेत सदस्यांना आधार देणे , खोटे गुन्हे नोंदवून सदस्यांना समाजातील अपप्रवृत्ती त्रास देत असतील तर अशा प्रवृत्तीपासून सदस्यांना संरक्षण मिळवून देणे अशी या संघटनेची उद्दिष्टे आहेत
लवकरच या संघटनेचा राज्यभर विस्तार केला जाणार आहे राज्यात प्रत्येक जिल्हा आणि तालुका पातळीवर कार्यकारी समित्या नियुक्त केल्या