जळगाव ( प्रतिनिधी ) – उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात परिवहनेत्तर संवर्गातील चारचाकी वाहनांची नवीन नोंदणी एमएच-19/डीव्ही-0001 ते 9999 पर्यंतची मालिका 23 सप्टेंबरपासून सुरु करण्यात येत आहे.
ज्या वाहनधारकांना पसंतीचा क्रमांक हवा असेल त्यांनी 15 सप्टेंबरपासून अर्ज सादर करावेत. अर्ज दुपारी चार वाजेपर्यंत स्वीकारले जातील. या अर्जासोबत शासकीय शुल्काचा धनादेश उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या नावे द्यावा.
विहीत शुल्काच्या रकमेचा भरणा मालिका सुरु झाल्यावर करुन पसंतीचा नोंदणी क्रमांक प्राप्त करुन घ्यावा. आकर्षक क्रमांकासाठी शुल्क भरल्यावर वाहनाचे कागदपत्र तात्काळ सादर करणे अनिवार्य राहील.
एकापेक्षा जास्त अर्ज आलेल्या क्रमांकाच्या बाबतीत 22 सप्टेंबररोजी संध्याकाळी 4.00 वाजेपर्यंत वाढीव शुल्काचा धनादेश बंद लिफाफ्यातून सादर करणे बंधनकारक राहील. 23 सप्टेंबररोजी सकाळी बंद लिफाफे उघडण्यात येतील व जास्त रक्कमेचे धनादेश सादर केलेल्या अर्जदारास क्रमांक देण्यात येईल अधिक माहितीसाठी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचे कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी केले आहे.