जळगाव ( प्रतिनिधी ) – गणेशोत्सवानिमित्त शहरातील विविध श्रीगणेश मंडळांच्या ठिकाणी महापौर .जयश्री सुनील महाजन यांच्या हस्ते आरती करण्यात आली.
‘जळगाव लाईव्ह न्यूज’चे कार्यालय, मेहरूण परिसरातील पाटील वाड्यातील ‘नव दुर्गा मित्र मंडळ’, नेरी नाका परिसरातील ‘लक्झरी बस स्टॅन्ड मित्र मंडळ’, मेहरूण परिसरात रामेश्वर कॉलनीजवळील ‘हनुमान नगर मित्र मंडळ’, रामेश्वर कॉलनी परिसरातील ‘रिद्धी सिद्धी गणपती मित्र मंडळ’, रामेश्वर कॉलनी परिसरातील ‘एमडीएस कॉलनी मित्र मंडळ’, रामेश्वर कॉलनी परिसरातील मंगलपुरी नगरात ‘जय बजरंग मित्र मंडळ’, पिंप्राळा शिवार परिसरातील शिंदे नगरात ‘अष्टविनायक गणेश मित्र मंडळ’, शनिपेठ परिसरातील ‘शिवशक्ती मित्र मंडळ’, जुने जळगाव परिसरातील विठ्ठल पेठेत ‘श्री विठ्ठलपेठ सामाजिक व सांस्कृतिक मित्र मंडळ’, रामेश्वर कॉलनी परिसरातील नागसेन नगरात ‘नागसेन नगर मित्र मंडळ’, मोहाडी रोड परिसरातील ‘श्री छत्रपती गणेश मित्र मंडळ’, रायसोनी नगर परिसरातील ‘शिवनेरी चौक मित्र मंडळ’ व खेडी परिसरातील गोदावरी इंजिनीयरिंग कॉलेज समोरील ग्यानचेतना रेसिडेन्सी येथे ‘ग्यानचेतना सोसायटी मित्र मंडळ’ च्या श्रीगणेशोत्सवांतर्गत बाप्पाची आरती करण्यात आली.
यावेळी उपस्थित परिसरातील रहिवासी भक्तगणांनी शासनाने घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचना व नियमांचे पालन करत महापौर जयश्री महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतःच्या घरासह शहर स्वच्छ ठेवण्यासाठी सदैव तत्पर राहणे, पाण्याच्या अपव्ययासह होणारी नासाडी थांबविणे, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी किमान एक झाड लावून ते दत्तक घेत त्याचे संगोपन करणे यासाठीची प्रतिज्ञा स्वयंस्फूर्तीने घेतली.