जळगाव ( प्रतिनिधी ) – कुटुंबातील सगळे लोक वरच्या मजल्यावर झोपलेले असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी घरातील १२ हजार रुपये रोख रकमेसह दागिने मिळून सव्वा लाखाचा ऐवज लंपास केल्याची घटना आज सकाळी तांबापुरात उघडकीस आली

सरफराज खान आयुब खान ( रा. पंचशील नगर इच्छादेवीच्या मागे ताबापूरा ) येथे राहतात ते रात्री वरच्या घरात झोपलेले असताना खालच्या घराचे कुलुप तोडून अज्ञात भामट्यांनी सव्वा लाखाच्या जवळपास ऐवज लंपास झाल्याचे सांगण्यात आले रोख रक्कम 12 हजार होती आणि दिड तोळ्याची सोन्याची पोत , चांदीचा कडा व पोत असा एकुण सव्वा लाख रुपयांचा ऐवज लंपास झाला एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. खान यांच्या कुटुंबात चार लोक राहातात.







