मुंबई ( प्रतिनिधी ) – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी आज पोलीस महासंचालक कार्यालयात अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली पोलिस महासंचालक संजय पांडे, मुख्य सचिव सीताराम कुंटे , अतिरिक्त मुख्य सचिव गृह मनुकुमार श्रीवास्तव उपस्थित होते.


या व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून झालेल्या बैठकीत प्रामुख्याने ज्या जिल्ह्यात गेल्या काही दिवसात महिलांच्या बाबतीत घटना घडल्या आहेत त्या जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक,पोलीस आयुक्त सहभागी होते राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली
शिवाय राज्यातील सर्वच अधिकाऱ्यांशी मुख्यमंत्री आज संवाद साधला असून महिलांच्या सुरक्षेसाठी अजून कोणत्या उपाययोजना करू शकतो यावर अधिकाऱ्यांशी चर्चा झाली








