जळगाव ( प्रतिनिधी ) – जिल्हा रूग्णालयाजवळच्या रस्त्यावरून जाणाऱ्या सेवानिवृत्त व्यक्तीच्या खिशात ठेवलेला ७ हजार रूपये किंमतीचा मोबाईल अल्पवयीन मुलाने चोरून नेल्याची घटना घडली जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

दासोपंत सुका भंगाळे (वय-६४, रा. सदोबा नगर हिरापाईप जळगाव ) हे बसआगारातील सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. काल ते सकाळी ११ वाजता शहरातील नवीन बी.जे. मार्केटसमोरील भंगार बाजारातील जुने इलेक्ट्रिक साहित्य विक्रीच्या ठिकाणी उभे होते. त्यावेळी १५ वर्षीय मुलगा त्यांच्याजवळ आला आणि त्याने पॅन्टच्या मागच्या खिशात ठेवलेला ७ हजार रूपये किंमतीचा मोबाईल लांबविला. दासोपंत भंगाळे यांच्या फिर्यादीवरून जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो ना संतोष सोनवणे करीत आहे.







