पुणे (वृत्तसंस्था) – सर्वसामान्य पुणेकरांना कुटुंबातील व्यक्तीच्या निधनानंतर अंत्यविधीला घेऊन जाण्यासाठीची सुविधा पालिकेद्वारे आहे. याच सेवेत असलेले पुष्पक सेवेच्या 4 बस आणि पीएमपीचे 24 बस चालक करोनामुळे मृत्यूखी पडलेल्या व्यक्तीचा मृतदेह स्मशानापर्यंत पोहचविण्याचे काम करत आहेत. लॉकडाऊन आणि करोनाचा प्रसार वाढत असल्याने भीतीदायक वातावरण आहे, अशा स्थितीत शहरात असलेल्या शेकडो खासगी रुग्णवाहिकांचे चालक गावी निघून गेले आहेत. तर जे चालक वाहनासह आहेत ते करोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णाचे मृतदेह घेऊन जाण्यास नकार देत आहेत. त्यामुळे या स्थितीत सामाजिक भान तसेच आपल्या कर्तव्याची जाण असलेले पीएमपीचे 24 चालक 24 तास तीन शिफ्टमध्ये या कामासाठी कार्यरत आहेत. पालिकेच्या चार रुग्णवाहिका आणि 4 पुष्पक बसेस या कामासाठी नियुक्त करण्यात आल्या असून त्यावर हे सर्व चालक कार्यरत आहेत, असे प्रशासनाने सांगितले.