जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव महापालिकेचे सहायक आयुक्त आकाश डोईफोडे यांची बोदवड नगरपंचायतीचे मुख्याधिकारी म्हणून बदली झाली असून तसे आदेश जारी करण्यात आले आहेत.


नगरविकास खात्याच्या निर्देशानुसार जळगाव महापालिकेत सध्या सहायक आयुक्त असणारे आकाश डोईफोडे यांची बोदवड येथे नियुक्ती करण्यात आलेली आहे. डोईफोडे आता बोदवड येथील नगरपंचायतीचे मुख्याधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. ते लवकरच कार्यभार सांभाळण्याची शक्यता आहे.
बोदवड नगरपंचायतीच्या विकासकामांना आता आकाश डोईफोडे यांच्या पूर्णवेळ नियुक्तीने वेग येण्याची आशा आहे.







