जामनेर (प्रतिनिधी) – येथे गणेशोत्सव उद्या कोरोना काळ असल्याने साधेपणाने साजरा करावा असे आवाहन पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी केले आहे. त्याचबरोबर गणेशमूर्तीच्या उंचीवर मर्यादा आणण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. काल ते पत्रकारांसोबत घेतलेल्या बैठकीत मध्ये बोलत होते.

“लोकमान्यांची परंपरा आपल्याला पुढे न्यायची आहे पण ती सुरक्षित व्हायला पाहिजे. मी कुठल्याही वादळाला आणि संकटाला घाबरत नाही. आता आपली परीक्षा आहे. विघ्नहर्ताही आपल्याकडे पहात असतील की आपण काय शिकलो आणि कसं वागतोय.””गणेश मूर्तींची उंची हा प्रश्न आहेच. जर आपण उत्सव साधेपणाने करतोय तर मग कोणत्याही प्रकारचे वाजंत्री , ढोल ,तासे, डीजे, हे बंद असतील कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्व स्तरांत अनिश्चिततेचं सावट आलं आहे.
दरम्यान सणवार कसे साजरे करणार याची चिंता सगळ्यांना लागून राहिली आहे. गणेशोत्सव हा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा उत्सव असतो. हजारो लाखो भाविक गणरायाच्या दर्शनासाठी एकत्र जमतात. मात्र यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे हा सण कसा साजरा होणार याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.त्याचबरोबरीने महाराष्ट्रातल्या इतर भागात हा सण कसा साजरा केला जाईल याबद्दल आम्ही माहिती घेतली असून अनेक मोठ-मोठी गणेशोत्सव मंडळं आहेत. सध्या कोरोनाचं संकट मोठं आहे पण गणेशोत्सव कसा साजरा होणार
देशावर या संकटामुळे जो भार आला आहे त्यामुळे सामान्य माणूस आर्थिक अडचणीत आहे
यापलीकडे उत्सव कसा साजरा करायचा यासाठी आम्ही त्यानुसार प्रशासनाकडून जे सांगेल त्याप्रमाणे यंदाच्या गणेशभक्तांच्या आरोग्याचा आणि सामाजिक बांधिलकीचा विचार करूनच साजरा करू असंही ते पुढे म्हणाले. यावेळी प्रमुख उपस्थित डी .वाय.एस.पी भरत काकडे यांनी सुद्धा मार्गदर्शन केले व सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या या वेळी उपस्थित सर्व पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते,तसेच गणेश मंडळ चे सदस्य उपस्थित होते.







