कजगाव , ता . भडगाव ( प्रतिनिधी ) – तितूर नदीला गेल्या कित्येक वर्षात पूर आलेला नसल्याने बिनधास्त राहणाऱ्या लोकांना यंदा फटका बसला आहे यंदा दोनवेळा पूर आल्याचा अनुभव नवीन असल्याचे ज्येष्ठ नागरिक सांगतात यंदाच्या पुराने मात्र कजगाव भागातील ६ गावांचा संपर्क रस्ता वाहून गेल्याने तुटला आहे

मागील आठवड्यात झालेल्या पावसात तितुरला आलेल्या महापुरात नागद रस्त्यावरील भराव वाहून गेला होता तात्पुरत्या स्वरूपात डागडुजी करून रस्ता रहदारी साठी मोकळा करण्यात आला मात्र आजच्या महापुराने सर्वच भराव वाहून गेल्याने संपूर्ण रस्ताच आता नदीने व्यापून घेतला आहे नागद रस्त्यावरील भोरटेक , पिंप्री, खाजोळा, नेरी, वडगाव, सार्वे व अनेक खेड्यांचा मार्ग बंद असल्याने त्यांना वाघडीमार्गे कजगाव येथून यावे लागत आहे नागद रस्त्यावरील अनेक शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी मार्ग नसल्याने त्यांनी दोरीच्या साह्याने रस्ताच्या दुसऱ्या बाजूला जाऊन शेतीकामे आटोपली आहेत हा रस्ता कजगाव येथे येण्यासाठी एकमेव रस्ता असल्याने त्याची दुरुस्ती तात्काळ होणे गरजेचे आहे त्यामुळे हा रस्ता त्वरीत दुरुस्त करावा अशी मागणी होत आहे
कजगाव येथे एकच वर्षात दोनदा तितुर नदीला महापूर आला ८ सप्टेंबरला मध्यरात्री तितुर नदीला मोठ्या प्रमाणावर पाणी आले होते नदीच्या दोन्ही भागात पाणी असल्याने कजगाव परिसरातील पंचवीस खेड्यांचा संपर्क तुटला होता एकाच वर्षात आठ दिवसाच्या अंतराने तितुर नदीला महापूर आल्याचे बहुधा आतापर्यंत ही पहिलीच घटना असल्याचे जेष्ठ नागरिकांनि यावेळी बोलून दाखवले गेल्या अनेक वर्षांपासून तितुर नदी अश्या पद्धतीने कधीही वाहिली नव्हती मात्र वर्षातून दोनदा महापूर आल्याने ग्रामस्थांनाही आश्चर्याचा धक्क्याच बसला तितुर नदीच्या उगमस्थानावर झालेल्या जोरदार पावसामुळे पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणावर होत राहिला त्यामुळे पाण्याची पातळी वाढतच राहिली होती मध्यरात्री महापूर आल्याने जुनेगाव जीन परीसर पशुवैद्यकीय दवाखाना समोरील परीसर पाचपावली माता नगर ह्या ठिकाणच्या बहुतेक नागरीक रात्रभर जागे होते त्यामुळे नागरिकांनी संपूर्ण रात्र जागून काढली होती त्यावेळी काही नागरिकांनी भीती व्यक्त केली होती महापूर आल्याने काहीच्या घरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने अनेकांचे नुकसान झाले आहे तर अनेक शेतकऱ्यांना ही महापुराचा मोठ्या प्रमाणावर फाटका बसला आहे भडगाव चे तहसीलदार सागर ढवळे यांनी महसूल कर्मचाऱ्यांसह कजगाव भेट देऊन महापूर आलेल्या भागाची पाहणी केली व नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आला यावेळी महापुराचे पाणी पाहण्यासाठी ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केल्याचे दिसून आले.








