जळगाव ( प्रतिनिधी ) – जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत कर्मचारी संघटनांसाठी तक्रार निवारण सभा आयोजित करण्यात आली होती.


7 सप्टेंबररोजी जि . प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अधिपत्याखालील कर्मचाऱ्यांच्या सर्व संघटनांची तक्रार निवारण सभा आयोजित करण्यात आली होती . या सभेस उपमुख्य कार्यकारी अधिकारी ( साप्रवि ) रणदिवे , मुख्य लेखा व वित्त अधिकारी विनोद गायकवाड , महिला बालकल्याण अधिकारी राऊत , अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ प्रमोद पांढरे त्याचप्रमाणे सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते
तक्रार निवारण सभेच्या सुरुवातीला रणदिवे यांनी मागील वर्षात झालेल्या सभेचे इतिवृत्त वाचन केले . त्यात आरोग्य कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न विषयी मागासवर्गीय आरोग्य कर्मचारी संघटनेने दिलेल्या निवेदनातील मुद्द्यांचे वाचन करण्यात आले. नंतर इतर संघटनांची निवेदने व मुद्यांचे वाचन करण्यात आले. त्यानंतर सर्व विभागाचे सर्व संघटनांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी चर्चा करण्यात आली.
आरोग्य विभागाचा क्रमांक आल्यानंतर कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे विभागीय अध्यक्ष अनिल सुरडकर ,संघटनेचे केंद्रीय सहसचिव आर एस अडकमोल, जिल्हाध्यक्ष संजय ठाकूर यांनी वर्षानुवर्षे प्रलंबित समस्यांचा पाढाच वाचून दाखवला. संघटनेचे उपाध्यक्ष सुनील निकम , जिल्हा सचिव मिलिंद लोणारी , कार्याध्यक्ष महेंद्र वानखेडे उपस्थित होते.
नेहमीच अनुदानाअभावी उशिराने होणारे आरोग्य कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन , 10,12, 20 वर्षे आश्वासित कालबद्ध पदोन्नती , नियमित पदोन्नत्या,
जिल्हा परिषद सर्वसाधारण बदली प्रक्रियेमध्ये प्रशासकीय व विनंती बदलीने बदली झालेले कर्मचारी यांना जे अधिकारी कार्यमुक्त करत नसतील अशा अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई , सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना कालबद्ध पदोन्नतीचे फायदे , आरोग्य कर्मचाऱ्यांना फायदे स्थायित्व प्रमाणपत्र , सर्वच कर्मचाऱ्यांना हिंदी व मराठी भाषा सुट नोंदबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना , आरोग्य कर्मचारी यांचे बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित आंतर जिल्हा बदली प्रस्ताव निकाली काढावे , आदिवासी नवसंजीवनी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना घरभाडे भत्ता लागू करावा , भविष्य निर्वाह निधीचे प्रस्ताव निकाली काढावे , सेवा पुस्तकात सेवा प्रवेशोत्तर परीक्षा सूट असल्याबाबत नोंद घ्यावी , जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी त्यांच्या दालनात दरमहा संघटनेच्या बैठका घ्याव्या , जिल्हा परिषदेतील विभाग प्रमुख त्याचप्रमाणे सर्व अधिकारी यांनी संघटना पदाधिकाऱ्यांना सन्मानाची वागणूक द्यावी , कर्मचाऱ्यांना वेतन अदा केल्यानंतर वेतनाची स्लिप द्यावी , नेहमीच साठा जास्त येत असल्याने कोविंड लसीकरण केंद्रावर होणारी गर्दी त्यामुळे होणारे वादविवाद याकरिता कर्मचाऱ्यांना पोलीस संरक्षण तसेच एका दिवशी फक्त 250 लाभार्थींना लसीकरण लसीकरणाची डाटा एन्ट्री करण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ त्याचप्रमाणे इंटरनेट रिचार्जसाठी अनुदान , अतिरिक्त कामकाजाचा मोबदला , लसीकरणात कर्मचारी सुट्टीच्या दिवशी रविवारीसुद्धा काम करत असून त्यांना विश्रांतीसाठी पर्याय सुट्टी मिळावी , आरोग्य कर्मचाऱ्यांचे कामाचे तास निश्चित व्हावेत , आरोग्य कर्मचाऱ्यांची बायोमेट्रिक हजेरी बंद करावी , प्रशासकीय बदली झालेले कर्मचाऱ्यांना प्रवास भत्ता देयक अदा करावे , आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कालबद्ध पदोन्नती व इतर लाभ देण्यासाठी मूळ सेवा पुस्तक न मागवता संबंधित विभाग प्रमुख यांच्याकडून फक्त दाखला घ्यावा व सेवा पुस्तकाच्या छायांकित प्रती साक्षांकित करून घ्याव्यात या मागण्यावर चर्चा करण्यात आली मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कार्यवाहीचे आश्वासन दिले.
या सभेस राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे विभागीय अध्यक्ष अनिल सुरडकर, केंद्रीय सचिव आर एस अडकमोल , जिल्हाध्यक्ष सुनिल सोनवणे, संदीप केदारे, सचिव धिरज तायडे, विभागीय उपाध्यक्ष सुनिल निकम, कार्याध्यक्ष रविकिरण बिहाडे, संजय ठाकुर, मिलिंद लोणारी,उपस्थित होते.







