जळगाव ( प्रतिनिधी ) – हतनूर धरणातून अतिरिक्त पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडला जाणार असल्याने जिल्हा प्रशासनाने तापीनदीकाठाच्या गावांना दक्षतेचा इशारा दिला आहे.

यासंदर्भात जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सांगितले की , जिल्ह्यात गेल्या २ दिवसांपासून अतिवृष्टी होत आहे जिल्ह्यातील सर्वच नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात आणि उगम परिसरात जोरदार पाऊस झाला आहे त्यामुळे तापी आणि पूर्ण नदी काठावरच्या गावांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे पूर्णा नदीला आलेल्या पुरामुळे हे पाणी हतनूर धरणात आल्यावर हतनूर धरणातून अतिरिक्त पाण्याचा मोठ्या प्रमाणावर विसर्ग करावा लागणार आहे त्यानंतर तापी नदी काठावरच्या गावांचे रस्ते आणि पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे त्यामुळे लोकांनी शक्यतो या भागात विनाकारण प्रवास करू नये आवश्यक असेल तर आधी प्रशासनाकडून परिस्थितीची माहिती घ्यावी आणि मगच प्रवासाचा निर्णय घ्यावा नदीकाठच्या भागात विनाकारण जाऊ नये प्रशासन सतर्क असून संभाव्य परिस्थितीचे सर्वेक्षण सुरु केले आहे हतनूर धरणातून ४ लाख क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग करावा लागू शकतो नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे , असेही ते म्हणाले .







