चाळीसगाव ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील चैतन्यतांडा येथे घरासमोर उभी केलेली दुचाकी अज्ञात इसमाने चोरून नेल्याची घटना उघडकीला आली. चाळीसगाव ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
चंद्रकांत पाटील (वय-४५ , रा. चैतन्य तांडा ) तेथे परिवारासह वास्तव्यास असून एमआयडीसी येथे खासगी नोकरीला आहे. त्यांचा मुलगा दिपक पाटील हा मंगळवारी भारत वायररोप कंपनीत कामाला गेला. काम आटोपल्यानंतर तो रात्री घरी आला. तत्पूर्वी त्याने दुचाकी (क्र. एम.एच.१९ बीएस ३६९३) घरासमोरील कंपाऊंडमध्ये लावली. सकाळी दुचाकी मुळ ठिकाणी दिसून आली नाही. परिसरात शोधाशोध केली असता सापडली नाही. म्हणून २५ हजार रुपये किंमतीची स्प्लेंडर कंपनीची दुचाकी अज्ञात इसमाने चोरून नेल्याचे स्पष्ट झाल्याने चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात चंद्रकांत पाटील यांच्या फिर्यादीवरून अज्ञात इसमाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सुरू आहेत.