चाळीसगाव ( प्रतिनिधी ) – मेहुणबारे शिवारातून ३६ हजार रूपये किंमतीच्या तीन गायी आणि तीन वासरे अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचा प्रकार उघडकीला आला मेहुणबारे पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मेहुणबारे शिवारातील तिरपोळे रोडवर दिपक गढरी ( रा. मेहुणबारे ) यांचे शेत आहे. त्यांच्या शेतातील शेडमध्ये त्यांच्या मालकीच्या ३६ हजार रूपये किंमतीच्या तीन गायी आणि तीन वासरे बांधलेली होती . ६ सप्टेंबर रोजी रात्री ते ७ सप्टेंबर रोजी सकाळ दरम्यान अज्ञात चोरट्यांनी तीन गायी आणि तीन वासरे चोरून नेली . दिपक गढरी यांनी परिसरात गायींचा शोध घेतला परंतू आढळून आले नाही. त्यांनी मेहुणबारे पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात तक्रार दिली. त्यांवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पेाहेकॉ अरूण पाटील करीत आहे.