रावेर ( प्रतिनिधी ) – निंभोरा सिम शिवारातून बेकायदेशीर वाळूची वाहतूक करणारे ट्रक्टर महसूल विभागाने जप्त केले होते. जप्त केलेले वाळूचे ट्रक्टर आणि २ ट्रॉल्या चोरून नेल्याप्रकरणी निंभोरा पोलीस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निंभोंरा शिवारात बेकायदेशीर वाळूची वाहतूक करत असतांना तलाठी भाग्यश्री बर्वे यांनी कारवाई करत ट्रक्टरच्या दोन ट्रॉल्या निंभोरा सिम ते विटवा रस्त्याला लागून मोकळ्या जागेत जमा करण्यात आले होते. ही कारवाई १४ ऑगस्ट रेाजी रात्री केली होती. मोकळ्या जागेवर लावलेले ट्रक्टरच्या दोन ट्रॉल्या संशयित आरोपी शामा एकनाथ अटकाळे आणि ब्रिजलाल रामू सवर्णे ( रा. निंभेरा ता. रावेर ) यांनी चोरून नेले. तलाठी भाग्यश्री बर्वे यांच्या फिर्यादीवरून निंभोरा पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ बापू पाटील करीत आहे.