जळगाव ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील भादली येथील माहेर असलेल्या विवाहितेला ५० हजार रूपये माहेरहून आणावे म्हणून पतीसह सासू व सासऱ्यांकडून छळ केल्याचे उघडकीला आले आहे. नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भादली बुद्रुक येथील माहेर असलेल्या प्रतिमा रविंद्र पारधे यांचा विवाह भुसावळ तालुक्यातील साकरी येथील रविंद्र रामा पारधे यांच्याशी २१ जुन २०१२ रोजी झाला. लग्नानंतर एक महिना चांगला गेला. त्यांना एक मुलगी झाली. मुलांचे पालन पोषण करण्यासाठी माहेरहून ५० हजार रूपये आणावे यासाठी पती रविंद्र पारधे यांनी मारहाण केली. सासू दगडाबाई पारधे आणि सासरे रामा पारधे ( रा साकरी ता. भुसावळ ) यांनी विवाहितेला आणि तिच्या वडीलांना शिवीगाळ केली. हा छळ असह्य झाल्याने विवाहिता माहेरी भादली बुद्रुक येथे निघून आल्या. त्यांनी ७ सप्टेंबर रोजी पतीसह सासू व सासरे यांच्याविरोधात नशिराबाद पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.