जळगाव ( प्रतिनिधी ) – मेहरूणच्या महादेव मंदिर परिसरात रात्रीच्या अंधारात अस्तित्व लपवून संशयास्पद फिरणाऱ्या व्यक्तीविरोधात एम आय डी सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पो.कॉ. राकेश बच्छाव यांनी दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की , काल रात्री त्यांच्यासह पोउनि दिपक जगदाळे, सफौ अतुल वंजारी, पोना इम्रान सैय्यद, पोकॉ किशोर पाटील, सुधीर साळेव, गोविदा पाटील, मंदार पाटील , साईनाथ मुढे कोम्बीग ऑपरेशन साठी नेमलेले होते रात्री 01.30 वाजेच्या सुमारास मेहरूणच्या महादेव मंदिर परिसरात रात्रीच्या अंधारात अस्तित्व लपवून संशयास्पद फिरणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी पाठलाग करून पकडले होते त्याची चौकशी केल्यावर त्याने आपले नाव विशाल किशोर मराठे, ( वय-21 वर्षे, रा-विश्वकर्मा नगर, रामेश्वर कॉलनी ,मेहरुण ) असे सांगीतले. एवढ्या रात्री कुठे फिरतोय अशी विचारपुस केली असता तो समाधानकारक माहिती देत नव्हता म्हणुन त्यास ताब्यात घेतले आहे. त्याच्या विरोधात मुंबई पोलीस एक्ट 122 (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .