जळगाव ( प्रतिनिधी ) – सध्या मुंबईत असलेले आमदार गिरीश महाजन उद्या जामनेर तालुक्यातील पूर आणि अतिवृष्टीग्रस्त गावांना भेटी देऊन पाहणी करणार आहेत.
आज आमदार गिरीश महाजन यांच्या पत्नी आणि जामनेरच्या नगराध्यक्ष साधना महाजन यांनी अतिवृष्टी आणि पूरग्रस्त गावांमध्ये जाऊन परिस्थितीचा अंदाज घेतला . त्यांनी जिल्हा प्रशासनाला माहिती दिल्यानंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जामनेर तालुक्यासाठी आवश्यक ती मदत जामनेर तालुक्यात विनविलम्ब पोहचविण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले . जामनेरच्या स्थानिक अधिकाऱ्यांच्या संपर्कात जिल्हाधिकारी अभिजित राऊत आहेत आरोग्य , कृषी आणि महसूल खात्याचे स्थानिक अधिकारी जिल्हाधिकाऱ्यांना आवश्यक तशी माहिती देत आहेत उद्या आमदार गिरीश महाजन यांच्या पाहणी दौर्यांनंतर जामनेरात प्रशासनाची बैठक तात्काळ होण्याची आशा पूर आणि अतिवृष्टीग्रस्त गावांमधील शेतकरी व्यक्त करीत आहेत.
आज जामनेर तालुक्यातील परिस्थिती समजल्यानंतर आमदार गिरीश महाजन लगेच मुंबईहून विमानाने औरंगाबाद आले औरंगाबादहून ते वाहनाने जामनेरकडे निघाले असून रात्री ९ पर्यंत जामनेरला पोहचतील असे सांगण्यात आले उद्या सकाळपासून ते जामनेर तालुक्यातील पूरग्रस्त गावांची पाहणी करणार आहेत.