यावल (प्रतिनिधी ) – तालुक्यातील साकळी ते मनवेल रस्त्यावर प्रवाशी रिक्षाची दुचाकीला धडक बसल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी घडली. रिक्षाचालक रिक्षा सोडून पसार झाला यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
साकळी येथील रहिवाशी भास्कर उखा भील (वय-६२) हे दुचाकीने मंगळवारी दुपारी कामावरून साकळी येथे जात होते. साकळी ते मनवेल रस्त्याने जात असतांना समोरून भरधाव येणाऱ्या रिक्षा (एमएच १९ एजे ०१९४) ने दुचाकीला धडक दिली. या अपघातात भास्कर भिल यांचा जागीच मृत्यू झाला. अपघात झाल्यावर रिक्षाचालक रिक्षा सोडून पसार झाला . मयताचा मुलगा ताथु भिल याच्या फिर्यादीवरून यावल पोलीसात रिक्षा चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावल पोलीस ठाण्यात अपघातातील रिक्षा जमा करण्यात आली आहे. पुढील तपास सपोनि जितेंद्र खैरनार करीत आहे.