नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येमध्ये गेल्या २४ तासांमध्ये १००७ रुग्णांची वाढ झाली असून या कालावधीत २३ कोरोनाग्रस्तांना आपला जीव गमवावा लागला आहे. याबाबतची अधिकृत माहिती आरोग्य मंत्रालयाच्या दैनिक वार्तालापातून देण्यात आली.वाढ झालेल्या नव्या १००७ रुग्णांमुळे देशभरातील कोरोनाग्रस्तांचा आकडा १३३८६ वर जाऊन पोहोचला आहे. देशभरामध्ये सध्याच्या घडीला ११२०१ कोरोनाग्रस्त उपचार घेत असून १७४८ जण या आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत. दुर्दैवाने उपचारादरम्यान आतापर्यंत ४३७ रुग्णांना आपले प्राण गमवावे लागलेत.