मुक्ताईनगर (प्रतिनिधी) – मुक्ताईनगर पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे अंतुर्ली, कुऱ्हा, उचंदा व घोडसगाव हद्दीत प्रॉव्हिशन कायद्यानुसारच्या गुन्ह्यांतर्गत चार ठिकाणी छापे टाकून ४५ हजारांचे दारू बनवण्याचे कच्चे रसायन नष्ट करण्यात आले.

आज पोळा सण शांततेत पार पडावा, यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक लावंड यांच्या मार्गदर्शनाखाली मुक्ताईनगर पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे अंतुर्ली, कुऱ्हा, उचंदा, व घोडसगाव हद्दीत प्रॉव्हिशन गुन्ह्याखाली 4 ठिकाणी छापे टाकून केसेस करून एकूण 45,000 रु किमतीची सुमारे 675 लिटर कच्चे पक्के रसायन, 70 लिटर गूळ, मोह व नवसागर मिश्रित रसायन व 25 लिटर तयार दारू असा मुद्देमाल जागीच नष्ट करण्यात आला.
पोलीस निरीक्षक राहुल खताळ, पोउनि परवीन तडवी, पोउनि.प्रदीप शेवाळे, पोहेका संतोष चौधरी, गणेश मनुरे, संजय पाटील, अशोक जाधव, पो ना. संतोष नागरे, गजमल पाटील, अविनाश पाटील, मोतीलाल बोरसे, पोकॉ रवींद्र मेढे, हेमंत महाजन, संजय लाटे, राहुल नावकर, सागर सावे, राहुल बेहेनवाल ,अभिमान पाटील, राहुल महाजन, रवी चौधरी, माधव गोरेवार, मंगल साळूके यांनी छापे टाकून ही कारवाई केली मुक्ताईनगर शहरात पोहेकॉ श्रावण जवरे, पोकॉ.गोपीचंद सोनवणे, सचिन जाधव यांनी जुगाराच्या डावावर धाड टाकली.







