अहमदनगर ( वृत्तसंस्था )— केडगाव येथे एकाच कुटुंबातील तिघांचे मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. सोमवारी केडगावदेवी रोडवरील अथर्व नगर येथे ही घटना घडली.
मयतांमध्ये माता-पित्यांसह दहा वर्षाच्या मुलीचा समावेश आहे. संदीप फाटक (वय 40) किरण फाटक (वय32) व मैथिली फाटक (वय 10) अशी मयतांची नावे आहेत. आई-वडिलांनी प्रथम मुलीला गळफास देऊन नंतर स्वतः आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक राकेश मानगावकर यांनी पथकासह घटनास्थळी भेट दिली. शवविच्छेदनासाठी मृतदेह जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. फाटक हे व्यवसायिक होते. मात्र व्यवसायात नुकसान झाल्याने त्यांच्यावरील खर्च वाढले होते.याच तणावातून त्यानी कुटुंबासह आत्महत्या केली असल्याचे समोर येत आहे.