यावल (तालुका प्रतिनिधी) – चुंचाळे ता.यावल येथे दि. ५ सप्टेंबर रोजी चुंचाळे जि.प.शाळेत डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती शिक्षक दिन म्हणून साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प.शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दिपक कोळी हे होते. यावेळी व्यासपीठावर उपाध्यंक्ष लुकमान तडवी,मुख्यध्यापक गिरीश सपकाळे ,राहूल वाणी,सुरेखा त्रिपाटी,राजु सोनवणे, मंजित तडवी, उपस्थित होते.
यावेळी व्यवस्थापन समिती अध्यक्ष दिपक कोळी व मान्यवराच्या शुभहस्ते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले. यानंतर श्रीमती सुरेखा त्रिपाटी मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष दिपक कोळी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे जीवन व शिक्षक दिनाचे औचित्य साधून गुरुचे महत्त्व सखोलपणे विशद केले.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री राहूल वाणी तर आभार श्री. राजु सोनवणे यांनी मानले. सदर कार्यक्रमच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाचे मुख्यध्यापक , शिक्षक- शिक्षिका यांनी परिश्रम घेतले.