यावल (तालुका प्रतिनिधी ) – तालुक्यातील न्हावी येथील दलीत वस्तीमध्ये झालेल्या कामाची माहिती निवेदन देऊन मागूनदेखील मिळत नसल्याने प्रांताधिकारी यांना स्मरण पत्र देण्यात आले.
आठ दिवसांपूर्वी निवेदनाव्दारे विविध प्रश्नांची उत्तरे मिळावीत म्हणून माहिती अधिकारात निवेदन देण्यात आले होते, त्यात, न्हावी ग्रामपंचायतीला लाभलेल्या निधीतून दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत आजवर केलेल्या कामांची माहिती तसेच कामांचे अंदाजपत्रक व आराखडा देऊन विविध प्रश्न घेऊन भिम आर्मीच्या पदाधिकाऱ्यांनी हे निवेदन दिले होते.
परंतु माहिती देण्याकडे संबंधित प्रशासन जाणूनबुजून कानाडोळा करत आहे त्यामुळे यात मोठा भ्रष्टाचार झाला आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
प्रशासनाला जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी भिम आर्मी भारत एकता मिशन जिल्हा व तालुका युनिट यांच्यावतीने न्हावी येथील ग्रामपंचायतीसमोर १५ सप्टेंबररोजी ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे याची प्रशासन स्तरावर आपण नोंद घ्यावी व तात्काळ मागणीची पूर्तता करण्याची कार्यवाही करावी अशी मागणी भीम आर्मी भारत एकता मिशन तालुकाध्यक्ष हेमराज तायडे यांनी केली आहे
भीम आर्मीतर्फे फैजपूरचे प्रांताधिकारी , गटविकास अधिकारी व पोलीस स्टेशनला स्मरणपत्र देण्यात आले यावेळी जिल्हाध्यक्ष गणेश सपकाळे यांच्या मार्गदर्शना खाली राज्य प्रवक्ते रमाकांत तायडे, राज्य सचिव सुपडू संदानशिव, तालुकाध्यक्ष हेमराज तायडे, तालुका महासचिव प्रशांत तायडे, शहर सदस्य मंथन महिरे, बाबू सुरवाडे आदी उपस्थित होते.