जळगाव ( प्रतिनिधी ) – जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव तालुका अधिकारी टिमने प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकारी व कर्मचारी यांनी एकत्रित नियोजन करुन ५ मोठ्या गावांमध्ये प्रत्येक आरोग्य केंद्रा मध्ये एक मोठे गाव असे नियोजन करुन कोरोना लसीकरणाचे जंबो शिबिरांचे आयोजन केले आहे . या ५ शिबिरांमधून ११ हजार ५०० लोकांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे .

पालकमंत्री गुलाबराव पाटील , जि प अध्यक्षा रंजनाताई पाटील , जि प उपाध्यक्ष लालचंद पाटील , आरोग्य सभापती यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ जमादार , पंचायत समिती सभापती , गटविकास अधिकारी , पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेचे सदस्य तहसीलदार आणि संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी या शिबिरांच्या आयोजनासाठी पुढाकार घेऊन नियोजन केले आहे. या सर्व शिबिरांमध्ये लोकांना कोरोना प्रतिबंधक कोव्हीशील्ड लस दिली जाणार आहे.
भांदली प्रा आ केंद्राच्या कार्यक्षेत्रातील आसोदा येथे का .दो . भोळे शाळेत होणाऱ्या शिबिरात १५०० लोकांचे लसीकरण होणार आहे धामणगाव प्रा आ केंद्राच्या कार्यक्षेत्रातील ममुराबाद येथील शिबिरात १००० लोकांचे लसीकरण केले जाणार आहे . नशिराबादेतील शिबिरात ४००० लोकांच्या लसीकरणासाठी जि प शाळा द्वारकानगर , न्यू इंग्लिश स्कूल , सर्वोदय विद्यालय ( सुनसगाव रोड ) , जाजू हॉल ( ग्रामपंचायत जवळ ) , उर्दू स्कूल ( नाईकवाडा ) , जि प शाळा ( पेठ ) व प्रा आ केंद्र नशिराबाद या लसीकरण केंद्रांवर व्यवस्था करण्यात आली आहे . कानळदा येथील शिबिरात ३००० लोकांच्या लसीकरणासाठी प्रा आ केंद्र , जि प मुलांची शाळा , जि प मुलींची शाळा , कन्वाश्रम , राम मंदिर या लसीकरण केंद्रांवर व्यवस्था करण्यात आली आहे . म्हसावद येथील इंग्लिश माध्यमिक स्कूल लसीकरण केंद्रावर २००० लोकांच्या लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. या लसीकरण शिबिरांसाठी लोकांची नोंदणी करण्यासाठी स्थानिक कर्मचाऱ्यांना चामुंडामाता होमिओपॅथिक महाविद्यालयाचे वैद्यकीय अभ्यासक्रमाचे विद्यार्थी सहकार्य करणार आहेत. लोकांची गर्दी आणि नोंदणीच्या कामात येणाऱ्या संभाव्य तांत्रिक अडचणींमुळे गोंधळ होऊ नये म्हणून बंदोबस्तासाठी पोलिसही तैनात करण्यात येणार आहेत.
तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संजय चव्हाण यांच्यासह डॉ चेतन अग्निहोत्री , डॉ सागर नाशिककर , डॉ प्रतिभा बारी , डॉ पे. शेट्टीवार डॉ पराग पवार , डॉ तडवी , डॉ. इंगळे, डॉ प्रशांत गर्ग , डॉ निलेश अग्रवाल , श्री. भगवान सपकाळे मनोज महाजन,अमर भैसे हे व संमध्दीत प्रा. केंद्राचे कर्मचारी या शिबिरांच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहेत.







