फैजपूर ( प्रतिनिधी ) – दारू विक्रीच्या व्यवसायावर कायदेशीर कारवाई न करण्याच्या मोबदल्यात दरमहा ५०० रुपये हप्ता ठरवून पहिल्या हप्त्याचे ५०० रुपये घेताना आज फैजपूर पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक अनिल महाजन यांना लाच लुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले .

यावल तालुक्यातील पिंपरुड येथील एका अवैध दारू विक्रेत्याने लाच लुचपत प्रतिबंधक खात्याकडे ही तक्रार दाखल केल्यावर या कारवाईचा सापळा रचण्यात आला होता अनिल महाजन, ( वय-४०,पोलीस नाईक,ब.नं.२९६५,नेमणुक- फैजपुर पोलीस स्टेशन ) असे या आरोपी पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे लाच म्हणून स्वीकारलेली ५०० रुपयांची रक्कम आरोपीकडून हस्तगत करण्यात आली आहे लाचेची रक्कम स्वतः आरोपी यांनी फैजपुर पोलीस स्टेशन येथे पंचासमक्ष स्वीकारली म्हणुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लाच लुचपत प्रतिबंधक खात्याचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने , अपर पोलीस अधीक्षक निलेश सोनवणे , जळगावचे पोलीस उप अधीक्षक शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव, पोलीस अंमलदार दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, अशोक अहीरे, सुनिल पाटील, रविंद्र घुगे, शैला धनगर, मनोज जोशी, सुनिल शिरसाठ, जनार्धन चौधरी, प्रविण पाटील, महेश सोमवंशी, नासिर देशमुख, ईश्वर धनगर, प्रदिप पोळ यांनी हा सापळा रचला होता.







