जळगाव;- तालुक्यातील शिरसोली प्र. न. येथे आज रोजी राजेश जाधव (इन्कमटेक्स ऑफिसर मुंबई) व आनंदराव वाल्मिकराव चौथे यांनी मराठा समाजाला २० दिवसाचा लागणारा सर्व किराणा वाटप करण्यात आला. सध्या कोरोनामुळे देशात लॉकडाऊन असल्यामुळे हातावर पोट असणाऱ्या व्यक्तींचा रोजगार बुडून त्यांना दोन वेळचे पुरेसे अन्न मिळत नसल्याची परिस्थिती आहे . त्यामुळे गावामधील अनेकांचा रोजगार बुडाला असून उपासमारीची वेळ आली आहे . या अनुषन्गाने सामाजिक बांधिलकी म्हणून शिरसोलीतील मराठा समाज जनविकास फौंडेशन मंडळचे अध्यक्ष व उप अध्यक्ष सर्व सदस्य मंडळ गावातील समाज बांधव यांच्या साहाय्याने आज सुमारास २० समाज बांधवांना किराणा वाटप करण्यात आला . यावेळी शैलेंद्र इंगळे , विजय देसाई ,
नानासाहेब लामखेडे, डॉ. बेंद्रे , छत्रपती शिवाजी राजे बहुउद्देशिय संस्था, छत्रपती शिवाजी महाराज मंगल कार्यालय जळगाव,
मराठा उद्योजक विकास मंडळ जळगाव आदींचे सहकार्य लाभले .