मुंबई (वृत्तसंस्था) – संपूर्ण भारतात लॉकडाउन झाल्यानंतर सध्या सर्व व्यवसाय थांबले आहेत. दररोज शारीरिक कष्ट करणारे मजूर, कामगार व व्यावसायिक यांचे जीवन या कालावधीत सुखकर व्हावे यासाठी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शासन स्तरावर आवश्यक असणारे निर्देश दिले आहेत. लॉकडाऊनमुळे 26 मार्चनंतर संघटित व असंघटित मजुरांचे उपजीविका साधन थांबल्यामुळे विशेष आर्थिक पॅकेज देण्याबाबत कामगार आयुक्तांना सूचना दिल्या, तसेच 27 मार्च रोजी कामगारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना पत्र पाठविले.







