तळोदा (प्रतिनिधी) – मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे यांचा बद्दल अपशब्द बोलणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या निषेध व्यक्त करत स्मारक चौकात त्यांच्या पुतळा दहन करण्यात आला.केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका करताना वादग्रस्त विधान केल्याने शिवसेनेकडून संताप व्यक्त केला जात आहे. रायगड येथील महाडमध्ये राणेंची जन आशिर्वाद यात्र पोहचली त्यावेळी पत्रकारांशी बोलताना स्वातंत्र्य दिनाच्या भाषणावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका करताना राणेंनी मी असतो तर कानाखाली लगावली असती असं वक्तव्य केल्याचं पहायला मिळालं. तळोदा शहरात पण नारायण राणे यांचा पुतळ्याचे दहन करण्यात आला.

यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख विक्रांत मोरे, उपजिल्हा प्रमुख सोमु भैया, उपजिल्हा प्रमुख रुपसिग पाडवी, तालुका प्रमुख प्रकाश कुलकर्णी, तालुका संघटक आकाश वळवी, शहर प्रमुख जितेंद्र दुबे, शहर संघटक विनोद वंजारी, युवा सेना तालुका प्रमुख कल्पेश सुर्यवंशी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संजय पटेल, माजी उपनगराध्यक्ष गौतम जैन, सुरज माळी, श्रावण तीजविज, काशिनाथ कोळी, विजय मराठे, राहुल पाटील, नितु सोनार, निखिल सोनार, विपुल कुलकर्णी, पुष्पेंद्र दुबे, भूषण सोनार, जयेश माळी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष योगेश मराठे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संदीप परदेशी, कॉग्रेसचे नगर सेवक हितेंद्र क्षत्रिय आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
काय म्हणाले होते नारायण राणे?
जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्तानं सध्या काही जिल्ह्यात लोकांशी संवाद साधणारे नारायण राणे हे प्रत्येक ठिकाणी शिवसेना व मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करत आहेत. महाड इथं काल मुख्यमंत्र्यांबद्दल बोलताना राणे पुन्हा एकेरीवर आले. त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली वाजवण्याची भाषा केली. ‘मुख्यमंत्र्यांना काहीच कळत नाही, ते आम्हाला काय सांगणार. ते काय डॉक्टर आहेत का? तिसऱ्या लाटेचा आवाज त्यांना कुठून आला? त्याला बोलायचा अधिकार तरी आहे का? बाजूला एखादा सेक्रेटरी ठेव आणि विचारून बोल, असं राणे म्हणाले. देशाला स्वातंत्र्य मिळून किती वर्षे झाली हेही माहीत नाही? मी असतो तर कानाखालीच चढवली असती,’ असं राणे म्हणाले होते.







