यावल (प्रतिनिधी) – यावल तालुक्यातील चुंचाळे फाटा ते गावापर्यंतच्या रस्ता दुरुस्तीची मागणी भीम आर्मी यावल तालुका युनिटतर्फे शासनाच्या विविध विभाग प्रमुखांना निवेदन देवून करण्यात आली.
भीम आर्मीचे राज्य प्रवक्ता रमाकांत तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली व राज्य सचिव सुपडू संदानशिव यांच्या साथीने तसेच जळगाव जिल्हा प्रमुख गणेश सपकाळे यांच्या सूचनेनुसार यावल तालुक्यातील सर्व शासकीय अधिकारी त्यात प्रमाणे प्रांताधिकारी कैलास कडलग फैजपूर, तहसीलचे निवासी नायब तहसीलदार आर के पवार ,यावल गटविकास अधिकारी डॉ निलेश पाटील ,सार्वजनिक बांधकाम विभाग यावलचे उपविभागीय अधिकारी जे एस तडवी ,यावल पोलीस स्टेशन येथे शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत यावल तालूका प्रमुख हेमराज तायडे यांच्या नेतृत्वात यावल तालुक्यातील चुंचाळे फाटा ते चुंचाळे गाव या दरम्यानच्या रस्ते दुरुस्तुची मागणी असलेले निवेदन देण्यात आले. सदर रस्ता निकृष्ट असल्याने वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागते. यामुळे छोटे-मोठे अपघात नेहमीच होत असतात. सध्या पावसाळी दिवस असल्याने रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्यांमध्ये पाणी साचत आहे. यामुळे मोठा अपघात घडू शकतो. यासंदर्भात पाठपुरावा करून देखील प्रशासनाकडून दखल घेतली जात नाही. कदाचित या झोपलेल्या प्रशासनाला मोठा अपघात घडल्यावर जाग येईल कि काय असा प्रश्न राज्य प्रवक्ता रमाकांत तायडे यांनी उपस्थित केला आहे.