चोपडा (प्रतिनिधी) – चोपडा तालुक्यातील पांढरी येथील बालकाच्या मृत्यू प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी आदिवासी बांधवांनी दुसर्यांदा अडावद येथे रास्ता रोको आंदोलन करून आपला रोष व्यक्त केला. यानंतर या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत वृत्त असे की, चोपडा तालुक्यातील पांढरी येथील नुना सायसिंग पावरा या बालकाचा काही दिवसांपूर्वी संशयास्पद स्थितीतील मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी १५ ऑगस्ट रोजी आंदोलन करण्यात आले होते. मात्र गुन्हा दाखल न झाल्यामुळे आदिवासी बांधवानी अडावद पोलिस स्टेशनसमोर घोषणाबाजी करत, ठिय्या मांडला.
यानंतर नुना पावरा याचे वडील सायसिंग यांच्या फिर्यादीवरुन अडावद पोलिस ठाण्यात खुनाच्या गुन्ह्याची रात्री उशिरा नोंद करण्यात आली आहे.