जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील रस्त्यातील चिखलात फसलेली सायकल बाजूला करणार्या सुरेश देविदास सोमवंशी वय ५५ रा. कासमवाडी यांना महापालिकेच्या ठेकेदाराच्या ट्रॅक्टरने जोरदार धडक देवून मागच्या चाकात आल्योन त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज मंगळवार १७ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास कब्रस्थान कासमवाडी रोडवर घडली.यावेळी जिल्हा रूग्णालयात नातेवाईकांनी एकच आक्रोश केला होता. एमआयडीसी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत माहिती असी की सुरेश देविदास सोमवंशी वय ५५ रा. कासमवाडी हे शिलाई मशीन दुरूस्तीचे काम करतात. आज सकाळी ८ वाजता ते जामा मश्जिद जवळील त्यांच्या दुकानावर गेले. सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास जेवण करण्यासाठी ते सायकलने घरी निघाले होते. कासमवाडी रोडवून जात असतांना त्यांची सायकल रस्त्याच्या चिखलात फसली होती. सायकल काढत असतांना तेवढ्यात महापालिकेतील ठेकेदाराचे कचरा उचलणारे ट्रॅक्टर (एमएच १९ एपी ७३३०) या क्रमांकाच्या ट्रॅक्टरने त्यांना जोरदार धडक दिल्याने ते मागच्या चाकात आले. त्यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला.
परिसरातील नागरिकांनी धाव घेऊन त्यांचे मृतदेह जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आला होता. मयत सुरेश देविदास सोमवंशी मृत्यूची वार्ता नातवाईकांना मिळताच त्यांनी जिल्हा रूग्णालयात धाव घेतली. घरातील कर्ता माणूस गेल्याने पत्नी नूतन, मुलगी प्रणाली यांनी हंबरडा फोडला होता. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी आणि मुलगा हर्षल असा परिवार आहे. त्यांच्या मृत्यूने कासमवाडी येथे हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.